Vadgaon Maval : शेतकरी बचाव कृती समितीचे पुनर्गठन; अध्यक्षपदी रोहिदास धनवे, उपाध्यक्षपदी सुनील भोंगाडे यांची वर्णी

एमपीसी न्यूज – शेतकरी बचाव कृती समिती – निगडे, आंबळे, कल्हाट व पवळेवाडी एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 या समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून यापूर्वीची शेतकरी बचाव कृती समिती बरखास्त करण्यात आली आहे. नव्याने गठीत केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी हभप रोहिदास महाराज धनवे तर उपाध्यक्षपदी सुनील (नाना) भोंगाडे यांची निवड करण्यात आली आहे.

समितीचे मार्गदर्शक म्हणून आमदार सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, नगरसेवक गणेश खांडगे यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, समितीच्या कार्याध्यक्षपदी मोहन घोलप, सचिवपदी भिकाजी भागवत, सहसचिव समीर कदम, खजिनदारपदी गोपाळ पवळे, सहखजिनदार तानाजी करवंदे आदी पदाधिका-यांसह एकूण 45 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

कायदेशीर सल्लागार ॲड. सोमनाथ पवळे, सहसचिव समीर कदम, सहखजिनदार तानाजी करवंदे, सदस्य – दत्तात्रय पडवळ, गोविंद आंभोरे, रामचंद्र थरकुडे, दिगंबर आगिवले, बबुशा भांगरे, रविंद्र पवार, सोपान ठाकर, शंकर थरकुडे, दत्तात्रय वायकर, देविदास भांगरे, हनुमंत हांडे, मनोज करवंदे, युवराज पवळे, धोंडीबा भागवत, भरत करवंदे, देवराम कल्हाटकर, बंडु घोजगे, शिवाजी करवंदे, संतोष भांगरे, गणेश मारुती भांगरे, निलेश भागवत, भाऊसाहेब करवंदे, सुनिल शेलार, विलास भालेराव, सुर्यकांत भांगरे, बुधाजी जागेश्वर, बाबाजी साळवे, मारुती भांगरे, मारुती थरकुडे, योगेश थरकुडे, प्रकाश करवंदे, दत्ता कल्हाटकर, दत्ता पवार, शंकर कल्हाटकर, संभाजी करवंदे, बबन कल्हाटकर, शशिकांत कराळे, संजय भांगरे, संजय पवळे, अविनाश पवार, मारुती चव्हाण, सुखदेव भांगरे, शंकर आगिवले, राजु पवार आदींची सदस्यपदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी अध्यक्ष हभप रोहिदास महाराज धनवे म्हणाले, “एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 होण्याच्या दृष्टीने न्यायमार्गाने आंदोलन व उपोषण करणार, शिवाय यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचे भान ठेवून सक्रियपणे काम करणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.