Shirgaon News: शिरगांव येथे विद्युत शॉक लागून शेतात शेतकऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज: शिरगांव येथे विद्युत शॉक लागून शेतात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.(Shirgaon News) बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. राजाराम गोपाळे, रा. शिरगांव वय (65) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी 6 वा च्या सुमारास ते शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्या पायाचा स्पर्श तुटून पडलेल्या महावितरणच्या तारेला झाला व त्यांना जोरात शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. शेतातून ते परत न आल्याने त्यांच्या पत्नी सूमन यांनी काळजीपोटी शेतात शोधण्यास गेल्या असता त्यांना ते चिखलात पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा जोरदार विद्युत शॉक बसल्याने त्या जोरात ओरडल्या.

BRTS Bus Terminal: बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर करा – लक्ष्मण जगताप

हा मोठा आवाज ऐकून शेजारी असलेले बापू गोपाळे शेतात आले. त्यांना लक्षात आले की दोघांना विद्युत शॉक लागलेला आहे. त्यामुळे त्यांनी हातात बूट घालून सुमन यांना बाजूला केले व त्यांचे प्राण वाचवले.(shirgaon News) शिरगांव पोलीस चौकीतील पोलिसांनी सांगितले की, विद्युत शॉक लागल्याने बेशुद्ध शेतकरी राजाराम गोपाळे यांना तळेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले होते. याबाबत आकास्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.