Chakan News : चाकणमध्ये शिवसेना आक्रमक राणेंच्या विरोधात शिवराळ घोषणाबाजी

एमपीसी न्यूज : मुख्‍यमंत्री उध्दव ठाकरे यांच्‍याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विरोधात चाकण ( ता. खेड ) येथे पडसाद उमटले असून आक्रमक शिवसैनिकांनी भर चौकात शिवराळ घोषणाबाजी करत निषेध केला.

तसेच राणेंवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड यांनी केली असून या बाबतचे निवेदन चाकण पोलिसांना देण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २४ ) खेड तालुका शिवसेनेकडून पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांना गुन्हे दाखल करणेबाबत निवेदन देण्यात आले.

मुख्‍यमंत्री ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने  येथील माणिक चौकात महामार्गावर घोषणा देवुन राणेंचा जोरदार निषेध करण्यात आला.  यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, जि.प.सदस्य बाबाजी काळे, माजी तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, महिला आघाडीच्या विजया शिंदे, लक्ष्मण जाधव, रामदास जाधव, युवा सेनेचे विजयसिंह शिंदे, शेखर पिंगळे यांचेसह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.