Pune Mumbai Expressway : धक्कादायक ! पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर रिव्हॉलव्हर दाखवून ओव्हरटेक

गाडीवर शिवसेनेचे स्टिकर

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे महामार्गावरील एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे वाघाचे चिन्ह आहे. हा व्हिडीओ एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन शेअर केला असून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत असल्याचे जलील यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.

 

_MPC_DIR_MPU_II

 

हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.