Pune News : श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण, 0.287 हेक्टर वन जमीन वळती करण्यास मान्यता

एमपीसी न्यूज : श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी खेड तालुक्यातील मौजे भोरगिरी व आंबेगाव तालुक्यातील (Pune News) मौजे निगडाळे येथील एकूण 0.287 हेक्टर वन जमीन वळती करण्यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रा. य. पाटील यांनी दिली आहे.

राखीव वन क्षेत्राअंतर्गत भोरगिरी येथील गट क्रमांक 130 (सी. नं. 201- क्षेत्र 0.084 हेक्टर) निगडाळे येथील गट क्रमांक 244 (सी.नं. 200 ए- क्षेत्र 0.168, 0.020 व 0.015 हेक्टर ) अशी एकूण 0.287 हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Pimpri News : दररोज पाणीपुरवठा करा, चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करावा; मनसेची मागणी

वन जमीन वळतीकरणास मान्यता देतांना पुढील अटी व शर्तीचे अधीन राहून मान्यता दिली आहे. प्रकल्प यंत्रणा वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत केंद्र शासनाने तत्वत: मान्यता दिलेल्या आदेशातील सर्व अटींचे पालन केल्याची उप वनसंरक्षक (वन्यजीव) पुणे यांनी खात्री करावी. (Pune News) अधिनियमातील अटींचे अनुपालन न करणाऱ्यांवर वैधानिक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये. मजुरांचे वास्तव्यासाठी वनक्षेत्रात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येऊ नये. हे मान्यता आदेश 1 वर्षापर्यंत वैध राहतील, असेही पाटील यांनी कळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.