Sinhgad Road: अहमदनगर जिल्ह्यातील व्यक्तीची पुण्यातील लॉजमध्ये आत्महत्या

Sinhgad Road: A man from Ahmednagar district committed suicide in a lodge in Pune

एमपीसी न्यूज – अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

नंदू बेबी अंधारे (वय 39 रा. शेवगाव, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नंदू अंधारे हे मागील काही दिवसांपासून सिंहगड रस्ता परिसरातील लॉजमध्ये राहत होते. कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात आलो असल्याची माहिती त्यांनी लॉज मालकाला दिली होती.

सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर ते रूममध्ये गेले होते. आज दुपारी रूम स्वच्छ करणाऱ्या महिलेने दरवाजा ठोठावला असता तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता नंदू अंधारे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

त्यानंतर लॉजच्या मालकांनी सिंहगड पोलिसांना याची माहिती दिली. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडत आत प्रवेश केला आणि मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.