Hinjawadi : किराणा दुकानातून 43 हजारांचे साबण व तांदूळ चोरीला

अन्य तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न

0

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाचे दुकान फोडून दुकानातून 43 हजार 400 रुपयांचे साबणाचे बॉक्स आणि बासमती तांदूळ चोरून नेले. तसेच परिसरातील अन्य तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री साडेनऊ ते शुक्रवारी (दि. 16) सकाळी साडेआठ या कालावधीत पारखे वस्ती, माण रोड येथे घडली.

बगताराम लालाराम चौधरी (वय 34, रा. साखरे वस्ती, हिंजवडी. मूळ रा. राजस्थान) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 16) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे पारखे वस्ती येथे श्रीपवन ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 43 हजार 400 रुपयांचे रीन साबणाचे आठ बॉक्स आणि बासमती तांदळाच्या 25 किलो वजनाच्या 8 बॅग आणि रोख रक्कम चोरून नेली.

तसेच चोरट्यांनी माण रोडवर असलेले रमेश चौधरी यांचे गजराज ट्रेडर्स, आयुष क्लिनिक आणि पोमाराम चौधरी यांचे आशापुरा मेडिकल्स या दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.