Sobat Sakhichi : सोबत सखीची… Hyperthyroidism कारणं, लक्षणं व उपाय

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. थायरॉइड आजारावरील तिसरा भाग Hypothyroidism विषयावरील या मालिकेतील हा​ अठरावा ​भाग…

 


सोबत सखीची – भाग 18

Hyperthyroidism कारणं, लक्षणं व उपाय

 

नमस्कार. सोबत सखीची या यु ट्यूब channel वर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. मी आहे आपली सखी डॉ गौरी. थायरॉईडच्या व्हिडीओ चा हा तिसरा भाग  आहे. त्यामुळे ज्यांनी आधीचे  भाग बघितले  नाही, त्यांनी ते ही भाग नक्की बघा आणि चानेल वर नवीन असाल तर channel ला  प्लीज subscribe जरूर करा.आज आपण हायपर थायरोईड या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.  तेव्हा  अधिक वेळ खर्च  न करता आपण आजच्या व्हिडीओ ला सुरुवात करुया.

1. Hyperthyroidism म्हणजे काय?
हायपर म्हणजे जास्त. ज्या आजारात थायरोईड हार्मोन्सची लेव्हल प्रमाणापेक्षा जास्त वाढते, त्याला  hyperthyroidism असं म्हणतात. हा प्रकार Hypothyroidism  च्या बरोबर उलट असतो म्हणजे यात T4  किंवा  T3 आणि T4या हार्मोन्स ची लेव्हल प्रमाणापेक्षा जास्त असते, आणि TSH ची लेव्हल प्रमाणापेक्षा कमी. अर्थात यात काही minor variations असतात आणि त्यानुसार त्याचे Overt hyperthyroidism, Subclinical hyperthyroidism असेही प्रकार पडतात.

2. Hyperthyroidism होण्याची कारणे काय?
प्रेग्नन्सी मध्ये Hypothyroidism किंवा  Hyperthyroidism यापैकी कोणताही  होण्याचा धोका असतो. त्याबद्दल आपणपुढच्या एपिसोडमध्ये  बोलणारच आहोत.  मात्र प्रेग्नन्सी सोडून hyperthyroidism होण्याची कारणे काय ? ग्रेव्ह्स डिसीज नावाचा auto immune disorder, Thyroid nodule, Thyroid gland ला सूज, अति प्रमाणात आयोडीन, Hypothyroidism च्या औषधांचा अतिरेक या सारख्या कारणांमुळे Hyperthyroidism चा आजार होतो.

3. Hyperthyroidism झालेल्या व्यक्तींमध्ये कोणती लक्षणे दिसतात?
Hyperthyroidism मध्ये metabolism चा रेट लक्षणीयरीत्या वाढला असतो. त्याचाच परिणाम म्हणून Hyperthyroidism च्या पेशंट मध्ये कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही, in fact  झपाट्याने वजन कमी होतं. भूक भरपूर लागते आणि खूप खाऊन देखील प्रचंड प्रमाणात थकवा येतो.बसल्या जागेवर किंवा विश्रांती घेत असताना देखील प्रचंड प्रमाणात घाम येतो.  थोडासा देखील उष्मा सहन होत नाही. पेशंटच्या नाडीचे म्हणजेच हृदयाचे ठोके वाढले असतात.  हाताला tremersअर्थात कंप जाणवतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळी वेळेच्या आधी येते आणि अंगावर खूप कमी मात्रेत जातं. Hyperthyroidism च्या advance स्टेज मध्ये पेशंट चे डोळे बाहेर आल्याप्रमाणे दिसतात. केस गळण्याच प्रमाण वाढत.Nervouenessचं प्रमाण वाढतं.

4. Hyperthroidism च्या पेशंट ची ट्रीटमेंट कशी केली जाते?
Hyperthyroidism च्या ट्रीटमेंटमध्ये पेशंटचं वय, वजन, आजाराची तीव्रता यानुसार  Carbamazol, Methimazol, Propyl thyouracil यांचा उपयोग केला जातो.  Radioactive Iodine ablation थेरपी ज्यात रेडीयेशन च्या साह्याने थायारोईड ग्रंथी निष्प्रभ केली जाते आणि सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे operation च्या साह्याने थायारोईड ग्रंथी किंवा तिचा भाग काढून टाकला जातो.

5. Thyroid च्या आजाराचे निदान करणाऱ्या lab test कोणत्या ? आपल्याला Thyroidचा कोणत्या प्रकारचा  त्रास आहे  ? याचे निदान करण्यासाठी काही प्रकारच्या तपासण्या उपलब्ध आहेत. उदा. Bloodतपासणी, ज्यात हार्मोन्स आणि antibody यांचे टेस्टिंग केले जाते.Thyroid scan अर्थात thyroid ची सोनोग्राफी, FNAC म्हणजे छोटीशी सुई Thyroid gland मध्ये घालून त्यातून पेशी शोषून घेऊन त्या पेशी normal आहेत की abnormal याची तपासणी करणेयामधून आपल्याला कोणत्या प्रकारचा थायरॉइड चा आजार झाला आहे हे शोधून काढण सोपं जातं.

6. Hyperthyroidism चा त्रास असलेल्या व्यक्तींनी  कोणती काळजी घ्यावी ?
Hyperthyroidism चा त्रास असलेल्या व्यक्तींनी आहारात अत्यल्प प्रमाणात आयोडीन चा वापर करावा.Noniodized मीठाऐवजी सैंधव मीठाचा वापर करावा. आहारात सी फूड चे प्रमाण अत्यल्प असावे. अंड्यातील पिवळा भाग वर्ज्य करून पांढऱ्या भागाचे सेवन करावे. ताज्या भाज्या आणि फळांचा जास्तीत जास्त वापर करावा. Exercise मुळे शरीरात उष्णता निर्माण होते, शरीराचा basal metabolic rate वाढतो तसेच ह्रुदयाचे ठोके देखील वाढतात त्यामुळे Hyperthyroidism मध्ये exercise चा कितपत उपयोग होतो याचे exact उत्तर देणे कठीण आहे. मात्र प्रत्येकाच्या symptoms नुसार वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा चांगला उपयोग होतो. मात्र तद्न्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव  करणे कधीही श्रेयस्कर. Hyperthyroidism मध्ये  लो impact एरोबिक्स आणि त्यातही Water एरोबिक्स चा चांगला उपयोग होतो असा काही ठिकाणी उल्लेख सापडतो. पाण्यात चालने, पाण्यात जॉगिंग करणे यांचा चांगला उपयोग होतो असाही उल्लेख सापडतो. काही जणांना चालने, काही जणांना स्ट्रेंग्थ  ट्रेनिंग, तर काही जणांना squats, push ups यांचा चांगला उपयोग होतो. भुजंगासन, सर्वांगासन, मत्स्यासन, शीर्षासन आणि सेतुबंधासन या पाच योगसनांचा चांगला उपयोग झालेला दिसून येतो.

Hypothyroidism आणि Hyperthyroidism हे Thyroid चे सर्वात common आजार असले तरी  Thyroid nodules, Thyroid cancer, आनुवंशिक Thyroid आजार  यासारखे इतर काही Diseases  सुद्धा अधून मधून बघण्यात येतात. वयाच्या विशिष्ट अवस्थांमध्ये देखील म्हणजे अगदी लहानपणी, पौगंडावस्थेत किंवा प्रेग्नन्सी मध्ये Thyroid चे आजार वाढलेले दिसून येतात. त्यातलाच एक महत्वाचा प्रकार आहे Thyroid आणि pregnancy. याबद्दल आपण पुढच्या आठवड्यात माहिती जाणून  घेऊ. आजचा विडियो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि काही शंका असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये पोस्ट करा मी नक्की उत्तर देईन. पुढच्या आठवड्यात नवीन माहितीसह नक्की भेटू… तोपर्यंत धन्यवाद.

– डॉ. गौरी गणपत्ये
M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet
स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ
मोबाईल: 9423511070
ई-मेल: [email protected]

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.