Chinchwad : महिला सक्षमीकरणासाठी आयोजित मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज –  दक्षता फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात महिलांना विविध कोर्सेची माहिती देण्यात आली.

महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हा महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा उद्योग अधिकारी सुरेश उमाप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वुमेन्स डेव्हलेपमेंट फाऊंडेशनच्या संचालिका सुलभा उबाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, सचिन विधाते, महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे शुभंकर राऊत, नगरसेविका मीनल यादव, नगरसेविका सुलक्षणा धर, शिवभक्त अनिकेत घुले, आयशा शेख, रुपेश कदम, शशिकांत घुले, दक्षता समितीचे सदस्य रवी कोवे, स्वरुपा खापेकर, वैशाली कुलथे, कामिनी मिश्रा, शिल्पा अनपन, प्रेमा गायकवाड, जनाबाई मोरे, गौरी घंटे, किशोर शिंदे, कल्पना जाधव, सनी कड, ओंकार जगदाळे, राहुल राठोड, विकास गायकवाड, अविनाश जाधव, शब्बीर शेख, अजय पिल्ले आदी उपस्थित होते.

सुरेश उमाप म्हणाले की, महिलांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते त्यांनी त्यातून मार्ग काढावयास पाहिजे. महिलांनी सकारात्मक विचार करावयास पाहिजे. महिलांच्या विकासासाठी सरकारच्या अनेक योजना असून, त्याबाबत ग्रामपातळीवर जनजागृती गरजेची आहे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल करत असून, महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे.

कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक्षा घुले व निलेश हाके आणि दक्षता फाऊंडेशनच्या सदस्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.