Pune : छत्रपती शिवाजी मार्केटयार्डतर्फे १० टन अन्नधान्याची पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील सर्व घटकांच्या वतीने माणुसकी या नात्याने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांकरिता सढळ हाताने मदत देण्यात आली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पीठ, तेलापासून मिठापर्यंत अशा एकूण वीस जीवनावश्यक वस्तू एका मोठ्या पिशवीमध्ये भरून 540 कुटुंबीयांना ही मदत पाठवण्यात आली आहे. एकूण दहा टन अन्नधान्याचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे.

ही मदत मंडळाचे कार्यकर्ते स्वतः जाऊन देणार आहेत. कोल्हापूरपासून पुढे अंदाजे शंभर किलोमीटरवर चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी पुण्यातील काही गावांना मदत मिळाली नाही, कमी लोकसंख्या असलेली ही गावे आहेत. त्या ठिकाणी ही मदत घरोघरी जाऊन दिली जाणार आहे. फक्त माणुसकी हा उद्देश ठेवून ही मदत सर्व घटकांच्या वतीने निस्वार्थीपणे केली जात आहे.

यावेळी गणेश घुले, संदीप कटके, अनंत कुडले, संतोष नागरे, विलास थोपटे, नितीन जामगे, महेश शिर्के, योगेश यादव, सौरभ कुंजीर, संजय साष्टे, युवराज काची, माणिकशेट राठोड, किरण कटके, राजेश मोहोळ, राजेंद्र पठारे, तात्यासाहेब कोंडे, गणेश शेडगे, बापू भोसले, मारुती कटके, किशोर लडकत, निलेश थोरात, भरतभाई परदेशी, सत्यजित होनराव, आप्पासाहेब निवंगुणे ही सर्व मंडळी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.