Pune News : परदेशातून 1 नोव्हेंबरनंतर आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचे राज्य सरकारचे पालिकेला आदेश

एमपीसी न्यूज : ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून 1 नोव्हेंबरनंतर आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश राज्य आरोग्य विभागाने आज दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका तातडीने कार्यवाहीचे नियोजन करत असल्याची माहिती आरोग्यप्रमुख डॉ. आशीष भारती यांनी दिली.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बहुतांश देशांनी मागील काही दिवसांत आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. यानंतरही काही देशांत ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभमीवर आपल्या देशातही विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.

तर, राज्य शासनाने यापुढे जाऊन या प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्य आरोग्य विभागाने घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान राज्यात 1 नोव्हेंबरनंतर आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय विभागातर्फे घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.