Nigdi : रस्त्यावर भिक मागणाऱ्या सोनियाची शिक्षणाच्या गोडीमुळे दुष्टचक्रातून मुक्तता

एमपीसी न्यूज अस म्हणतात शिक्षण ही अशी वाट आहे जी तुम्हाला आंधाराकडून कधी न संपणाऱ्या प्रकाशाकडे घेऊन जाते. हीच शिक्षणाची प्रकाश वाट सिग्नलवर भीक मागणाऱ्या सोनियाला तिच्या आईकडे व पुढे शिक्षणाकडे घेऊन गेली. स्वप्नात सुद्धा वाटले नसेल एवढे बदल (Nigdi) तिच्या आयुष्यात अवघ्या दोन दिवसात एका पुस्तकामुळे घडले. तिच्या शिक्षणाच्या आवडीने ती संक्रांतीच्या शुभ दिनी तीच्या दुरावलेल्या आईला भेटली….आहे ना तिळगुळा सारखा गोड असा प्रसंग. एखाद्या पुस्तकाची कथा असावी किंवा चित्रपट असावा असा सोनियाचा (नाव बदलेले आहे) प्रवास आहे.

रस्त्यांवर खाण्यासाठी पैसे मागणारी किंवा फुले, खेळणी विकणारी मुले आपण रोज पहातो. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा चार-दोन रुपये हातावर टेकवून पुढे जातो. पण ते कोठुन आले असतील का आले असतील याचा कधी कोणी विचार करत नाही. मात्र एका शिक्षिकेने तो विचार केला अन सोनिया तिच्या आईपर्यंत पोहचु शकली. कारणही तसेच होते. कारण सिग्नलवर थांबलेल्या तृप्ती कोल्हटकर या शाळेतून घरी जात होत्या. त्यांना एका मुलीने सिग्नलवर मला पुस्तकासाठी पैसे हवेत अशी मागणी केली. शिक्षिकेला आश्चर्य वाटले नसते तरच नवल. त्यांनी पैसे देऊ केले पण मुलीची विचारपुस करत तिचा फोटो काढला व तो फोटो थेट पिंपरी-चिंचवड शहरात समाजीक कार्य करणाऱ्या सहगामी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार यांना संपर्क साधला.

त्यात दुसरा योगायोग झाला तो म्हणजे रुद्रवार व त्यांची टीम ही सोनियाला आधीपासूनच शोधत होती. साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये सोनियाचा फोटो सहगामीचे कार्यकर्ते सुधीर करंडे यांच्याकडे आला होता. तेव्हा बराच शोध घेतला होता परंतू सोनिया सापडली नव्हती. सोनियाची केस बाल कल्याण समिती कडे आधीच नोंदवली होती. सोनिया सापडल्याने आंद होता तसेच तिला सुरक्षित ताब्यात घेणे देखील गरजेचे होते. सोनियाची आई ही मागील पाच वर्षापासून आपल्या मुलीला शोधत होती. मात्र तिला घेऊन फिरणारे नातेवाईक हे सतत जागा बदलत असल्याने ती सापडत नव्हती.

Pune Metro : वाकड – बालेवाडी दरम्यान उभारणार मेट्रो लाईन 3 चा 1000 वा सेगमेंट

तिचा फोटो व नेमका ठिकाणा मिळाल्याने लागलीच दुसऱ्या दिवशी निगडी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे व सुधीर करंडे यांची प्राजक्ता रुद्रवार यांनी भेट घेतली. पोलिसांना सर्व माहिती मिळताच पोलीस निरीक्षक खुळे यांनी टीमला मदत करण्यास सूचना दिली.

14 जानेवारी रोजी दोन मार्शल व सहगामीचे सदस्य  सोनियाचा शोध घेत निगडीतील सिग्नल गाठला व तेथून पोलीसांनी सोनियाला ताब्यात घेतले. आपल्याला आई मिळणार हे ऐकून सोनियाला रडू आले. तिने स्वत: पोलीसांना हा सर्व प्रकार सांगितला. पोलिसांच्या सहकार्याने सोनियाला शहरातल्या आश्रमात तात्पुरता निवारा देण्यात आला.

दुसऱ्यादिवशी पोलिसांनी बालकल्याण समिती पुढे सोनियाला 15 जानेवारी रोजी सादर करत तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.यावेळी सोनियाने तिची आपबिती सांगितली. जी खूप धक्कादायक होती. मुळची अहमदनगर येथील असणारी सोनियाला तिचे बाबाच आईपासून दुर घेऊन आले होते.(Nigdi) पुढे विडलांनी तिला त्यांच्या नातेवाईकांकडे सोडले.यावेली नातेवाईकांनी तिला सिग्नलवर भीक मागण्यास भाग पाडले. दिवसाचे 200 ते 500 रुपये भिक मिळायची जी नातेवाईक घ्यायचे. भिकमिळावी म्हणून सोनियाला साधी अंघोळ देखील करू दिली जात नव्हती. मग शिक्षणतर खूप लांबची गोष्ट होती.तिने स्वत: हे सगळे कोर्टात सांगितले व मला शिकायचं आहे मला भीक मागायची नाही असे म्हणताच कोर्टात उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.

यासाऱ्यानंतर तिच्या आईने देखील खंबीरपणे निर्णय घेत तिला स्वतःजवळ न ठेवता तिचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व सुरक्षिततेसाठी माहेर आश्रमात भरती केले. जेणेकरून ती सुरक्षित रित्या शिक्षण घेऊ शकेल.

याविषयी बोलताना सहगामी च्या अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार म्हणाल्या की, अशी अनेक मुले आहेत पण तृप्ती मॅडम नी ज्या कळवळ्याने सानियाचा विचार केला तसा कोणी करत नाही. ज्या दिवशी हो विचार लोक करतील तेव्हा नक्की सिग्नलवरची मुले शाळेत शिक्षण घेताना दिसतील.(Nigdi) कारण कोणालाच असे भिक मागणे आवडत नाही, मजबुरीने त्यांना हे करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे मी म्हणन की सोनियाच्या सुटकेत सर्वांचा वाटा आहे अगदी तृप्ती म्रडम, पोलीस, तिची आई, सहगामी फाऊडेशन व माहेर आश्रमाच्या स्वाती पाटील या साऱ्यांनी पुढाकार घेतला नसता तर सोनियाला शिक्षण व आई दोन्ही नसते मिळाले. त्यामुळे नागरिकांना एकच सांगाव वाटत की संवेदना मरु देऊ नका, दीन दुबळ्यांना तुमची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.