Children Day : आपली स्वप्ने व मते सांगत विद्यार्थ्यांनी साजरा केला बालदिन

एमपीसी न्यूज – यशस्वी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी 14 नोव्हेंबर रोजी (Children’s Day) आपली स्वप्ने व मते मांडत, व्यक्त होत अगदी आगळा, वेगळा बालदिन सादरा केला.

क्लासमध्ये सायंकाळी सहा वाजता हा बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी सुरुवातील बालगीते गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. ज्यामध्ये मुलांना त्यांची स्वप्ने व सामाजिक परिस्थीतीवर भाष्य करण्यास सांगितले. यावेळी मुलांनी इतिहासात फक्त ठराविक स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख आहे आहे बाकी बरेच स्वातंत्र्यवीर दुर्लक्षित राहिले. तसेच शिक्षणामध्ये प्रात्यक्षिकांवर भर दिला गेला पाहिजे, आजकाल डिग्री असूनही नोकरी मिळत नाही कारण प्रॅक्टिकल नॉलेज नसते. परंतु, आता थोडा थोडा बदल होत आहे व भविष्यात अमुलाग्र बदल होईल, अशी आशा व्यक्त केली. तसेच, प्रत्येक राज्याची जी भाषा असेल; उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठी ती सर्वांना कंपल्सरी असावी. एका सीबीएससी बोर्डाच्या मुलीने सांगितले, आमच्या कॉलेजमध्ये मराठी नाही. त्या दृष्टीने सरकारने मराठी भाषा प्रत्येक शाळा, कॉलेजेला कंपल्सरी करावी; ऑप्शनल ठेवू नये.

Eco sensitive zone :  ‘इको-सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेतीक्षेत्र, धरण परिसरातील गावे समाविष्ट करु नका

मेडिकल सायन्सचा (Children’s Day) अभ्यास मातृभाषेत असावा, असे मुलांचे मत आहे. शालेय परिक्षेबद्दल सांगायचे तर, परिक्षा या घेतल्याच पाहिजेत असा विद्यार्थ्यांच्या सुर होता. नगरसेवक कसा निवडला पाहिजे? याबद्दल बरेच विद्यार्थी अनभिज्ञ होते.  आम्हाला राजकारणात रस नाही असे. तर काहींनी नगरसेवकांची कर्तव्ये व नागरिकांचे हक्क याबद्दल चर्चा केली. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणांत निकोप चर्चा झाली. ही चर्चा क्लासच्या मंजिरी सहस्त्रबुद्धे यांनी घडवून आणली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.