Pimpri News : लायसन्स बॅच नसणाऱ्या रिक्षा चालकांवरील कारवाईचे समर्थन मात्र परवाना धारकांना त्रास नको

वाहतूक विभाग महाराष्ट्र रिक्षा पंचायत  वतीने रिक्षा चालक मालकांची बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक विभागाच्या वतीने शहरातील बेशिस्त लायसन्स बॅच नसणाऱ्या आणि रिक्षात डीजे लावणे रॅश ड्रायव्हिंग करणे आदी प्रकरणी रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे. ज्या रिक्षा चालकांकडे लायसन्स बॅच नाही अशा व्यक्तींवर  कारवाई करावी, अशा कारवाईचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने समर्थन  करण्यात आले. परंतु, कारवाईच्या नावाखाली आधीच कोरोनाने त्रस्त झालेल्या लायसन्स बॅच परमिट धारक रिक्षाचालकांना त्रास होईल  अशीकृती होऊ नये अशी  मागणी रिक्षाचालक मालकांनी केली.

पिंपरी-चिंचवड पोलीस वाहतूक  शाखा आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी येथे रिक्षाचालक मालकांची बैठक आयोजित करण्यात आली  होती. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील, पोलीस निरीक्षण राजेंद्र कुंटे , महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे ,शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, धनंजय कुदळे ,विजय ढगारे , अविनाश जोगदंड, हिरामण गवारे, तुषार लोंढे, सुरज सोनवणे, सिद्धेश्वर सोनवणे, रवींद्र लंके, अजय साळवे ,तुकाराम देवडे , प्रदीप अय्यर, निखिल येवले, जयराम शिंदे, अप्रोज कोतवाल, अभिजीत जाधव, संजय दौंडकर, सोमनाथ आवारे, सोमनाथ शिंदे, रोहिदास बिनगुडे, शरद बोबडे, विश्वास पाटोळे, जुबेर सय्यद, शशिकांत पाखरे, राहुल शेळके, अमोल गायकवाड, विलास शिंदे, विजय नागेर, प्रमोद जुनवणे, गोरख भागांनगरे, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले, ज्यांच्याकडे लायसन्स, बॅच नाही अशा व्यक्ती रिक्षा चालक होऊ शकत नाही, ते रिक्षा चालक म्हणून वावरतात आणि चुकीचे कामे करतात अशामुळे रिक्षाचालक मालकांचे नाव खराब होत आहे आणि अपघात होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा लहान मुले, परप्रांतीय  व्यक्ती लायसन्स बॅच नसताना रिक्षा चालवत आहे. जास्त भाडे घेणे प्रवासी नकारणे तसेच इतरही विविध प्रकारे त्यांच्याकडून चुकीचे कामे केले जात आहेत. बेकदेशीर चुकीचे वागणाऱ्यांवरील कारवाईचे आम्ही समर्थन  करत आहोत. परंतु, वरून आदेश आला की कनिष्ठ  अधिकारी परिस्थिती समजून न घेता चुकीच्या पद्धतीने  सरसकट कारवाई करतात. यामुळे गव्हा बरोबर किडे देखिल रगडले जातात. कोरोनामुळे आरटीओ मध्ये रिक्षाचे पासिंग व इतर कामे कमी केली आहेत. यामुळे ज्यांची पासिंग नाही अशांना या कारवाईतून काही कालाविधी साठी सवलत मिळावी. नविन रिक्षा स्टँडला मान्यता देण्यात यावी अशी मागणी देखील बाबा कांबळे यांनी केली.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील म्हणाले, लायसन्स असताना रिक्षा चालवताना रिक्षात मोठ्या आवाजात डीजे लावून दारू पिऊन अनेक जण रिक्षा चालवत आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. छोटे अपघात वाढले आहेत.  अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाच्या वतीने  कारवाई सुरू आहे, पुढेही कारवाई सुरु राहणार आहे. परंतु, रिक्षा चालकांनी चुकीचे  ऑनलाईन खटले,महिला कर्मचारी यांची उद्धट वागणूक , सह विविध सुचना केल्या आहेत. या  सुचना रास्त आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काडण्यात येईल  भोसले यांनी सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे म्हणाले, चुकीचे जे वागतील त्यांना माफी नाही. वाहतुकीस शिस्त लावने हे आमचे कर्तव्य आहे. लहान लहान मुलांना रिक्षा चालविण्यास देणे हे चुकीचे आहे. जास्त शिप मिळते म्हणून काही रिक्षा मालक हे बेकायदेशीर काम करत आहेत. रिक्षा मालकांनी लायसन्स बॅच असल्याशिवाय रिक्षा शिपने देऊ नये अन्यथा रिक्षा मालकांवर देखील कारवाई करण्यात येईल. विनाकारण कारवाई होत असेल तर याबाबत तक्रार करा, याबाबत योग्य ती दखल घेतली जाईल. परंतु, वाहतुकीचे नियम पाळा , तसेच रिक्षा चालकांनी गुन्हे गारी रोखण्यासाठी पोलिसांना व्हाट्सअप ग्रुप तयार करून गुन्हेगारांची माहिती पोलिसांना कळल्यास चेनचोरी वाहनचोरी रस्त्यावरील गुन्हेगारी कमी होईल , बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील रिक्षा संघटना चांगले काम करत आहे या संघटनेतील सर्व सभासदांनी पोलिसांना सहकार्य करावे  असे, आवाहन देखील त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.