BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : घरातून सव्वादोन तोळ्यांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – सायंकाळच्या वेळी घरात कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने घरातून 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 5) फातिमानगर, मोशी येथे सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली.

तस्लिम एजार जहागीरदार (वय 26, रा. आदर्शनगर, फातिमानगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जहागीरदार यांचे घर गुरुवारी सायंकाळी सहा ते सात या कालावधीत उघडे होते. त्यावेळी त्यांच्या घरी कोणी नव्हते. दरम्यान, घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरातून 34 हजार रुपये किमतीचे 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3