Pimpri : स्वाइन फ्ल्यूने तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – स्वाइन फ्ल्यूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्ल्यूने आणखी एका तरुणीचा मृत्यू झाला. शहरात जानेवारी 2018 पासून आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूने मृत्यू होण्याची संख्या 30 झाली आहे.

रहाटणी येथील 26 वर्षीय तरुणीला स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यावरून बुधवारी (दि. 26) पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास वाढल्याने तिचा उपचार सुरु असतानाच रविवारी (दि. 30) मृत्यू झाला.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 19 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज तीन जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली आहे. दहा रुग्णांना सध्या कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.