Pune News : निवडणुकीवेळी बूथ केंद्रावर टगे कार्यकर्ते बसवले पाहिजे – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पदवीधर मतदारसंघाची निवडणुक ही संपर्काची निवडणुक असते. यामध्ये मतदारांशी संपर्क महत्वपूर्ण असून दिवाळी नंतरचे 12 दिवस पक्षातील सर्वांनी प्रचाराकरिता पूर्णवेळ दिला पाहिजे. मतदान टक्केवारी वाढवणे, बाेगस मतदान राेखणे याकरिता चांगले टगे जे वेळ पडली तर संघर्ष करतील असे बूथ केंद्रावर बसवले पाहिजेत. ज्यांनी मतदारांचे ओळखपत्र, आधारकार्ड  दाखवा असे म्हटले पाहिजे, सुरुवातीला दाेन-चारजण हाकलून दिले की कळते कडक शिस्तीत मतदान सुरु आहे. शेवटचा तास निवडणुकीत महत्वपूर्ण असताे, त्यावेळी बाेगस मतदान अधिक हाेत असते. महाराष्ट्रातील पाच ही जागा जिंकून आणण्याचे आपले लक्ष आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचे प्रचारार्थ पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात आयाेजित करण्यात आली हाेती. त्यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, पुणे पदवीधर निवडणुक प्रतिष्ठेची झालेली आहे असे वाटते त्यास वेगवेगळी कारणे असून ती जाहीरपणे मांडण्याची गरज नाही. वेळाेवेळी मतदार नाेंदणी वाढवा असे मी अनेकदा सांगितले. सन 2008 मध्ये मी पदवीधर निवडणुकीत आणि भगवानराव साळुंखे शिक्षक मतदारसंघात पुणे विभागातून निवडणुकीत उभे राहून प्रथम निवडून आलो. आम्ही दाेघे कसे निवडून आलो अनेकांना समजले नाही. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा गड फुटून काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ताब्यातून ढासळून जाऊ लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.