Talawade : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोन जखमींचा मृत्यू; अवघ्या 16 वर्षीय तरुणीचे संपले जीवन

एमपीसी न्यूज : तळवडे येथे कंपनीमध्ये लागलेल्या (Talawade) आगीत जखमी झालेल्यापैकी दोन तरुणींचा ससून रुग्णालयात आज मृत्यू झाला. तळवडे (Talawade) येथे ज्योतिबा मंदिरामागे बर्थडे केक वरील फायर क्रॅकरच्या कारखान्यात झालेला स्फोट आणि लागलेल्या आगीत होरपळून सहा महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. यापैकी एकूण दहा जणांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

आज सकाळी 16 वर्षीय प्रतीक्षा तोरणे हिचा मृत्यू झाला. प्रतीक्षा हिची 26 वर्षीय बहीण अपेक्षा हि देखील 40 टक्के भाजली आहे. या घटनेवर या दोघींच्या वडिलांनी अशोक तोरणे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

या घटनेत 31 वर्षीय शिल्पा आणि 45 वर्षीय कविता राठोड या मायलेकी देखील एडमिट आहेत. त्यांची परिस्थिती पाहून त्यांच्या पतीने देखील टाहो फोडला आहे.

नीलम गोऱ्हे यांनी आज रुग्णांना भेट दिली असता एका रुग्णाने चेहऱ्यावर (Talawade) सूज असताना देखील संवाद साधला. यावेळी रुग्णाने या घटनेत कोणाचीही चूक नसून आमच्या पाठीशी कोण आहे? असा प्रश्न केला असता त्यांच्या पाठीशी सरकार असल्याचे गोऱ्हे यांनी आश्वासन दिले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.