Talegaon: दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल

Talegaon: A case has been registered against a driver in connection with the death of a two-wheeler दुचाकीवर मागे बसलेल्यास दुखापत होऊन तो देखील जखमी झाला. तसेच दुचाकीचे नुकसान झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी (दि.31) अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. मात्र चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार चारचाकी वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत काशिनाथ बोऱ्हाडे (वय 22, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी भार्गव तुकाराम चिकणे (वय 28, रा. मोरया कॉलनी, तळेगाव फाट्याजवळ, वडगाव मावळ, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.3) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव चाकण रस्त्यावर तळेगाव दाभाडे येथील वाहतूक पोलीस चौकीसमोर शुक्रवारी (दि. 31) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात होऊन फिर्यादी यांच्या भावाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र आरोपी बोऱ्हाडे याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन भरधाव चालून फिर्यादी यांच्या भावाच्या दुचाकीला धडक दिली. यात फिर्यादी यांच्या भावाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

दुचाकीवर मागे बसलेल्यास दुखापत होऊन तो देखील जखमी झाला. तसेच दुचाकीचे नुकसान झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.