Talegaon : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 6) मध्यरात्री बाराच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवरील इंदुरी टोलनाक्याजवळ झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगावकडून चाकणच्या दिशेने जाणा-या कंटेनरने दुचाकीला (एम एच 08 / ए ए 5380) धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराने नाव अदयाप समजू शकले नाही. धडक दिलेल्या कंटेनर चालकाने कंटेनरसह घटनास्थळावरून पोबारा केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.