Talegaon Dabhade : आदर्श विद्या मंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – आदर्श विद्या मंदिर (प्राथमिक) व आदर्श बाल मंदिर “वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ” आणि “विविध गुणदर्शन कार्यक्रम” 28 डिसेंबर रोजी उत्साहात ( Talegaon Dabhade) साजरा झाला.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्री वाघ  व प्राध्यापक प्रमोद बो-हाडे  इंद्रायणी कॉलेज तळेगाव दाभाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

ईशस्तावनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्था सचिव यादवेंद्र खळदे यांनी केले. प्रा. वसंतराव पवार यांनी संस्थेच्या उर्से वराळे व निगडे येथील शाखांची माहिती आपल्या प्रस्ताविकेतून दिली.

पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख वैशाली इनामदार व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिज्ञा मांडे यांनी सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षातील पार पडलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा विषयक घडामोडींचे अहवाल वाचन केले.

Chinchwad : काळभोरनगर, चिंचवड स्टेशन परिसरातील जिजाऊ क्लिनिक सुरू करा

कला दालनाचे उद्घाटन  वाघ  यांच्या हस्ते करण्यात आले. कला दालनातून विद्यार्थ्यांनी केलेल्या कलेच्या विविध वस्तू मांडण्यात आलेल्या होत्या. कला दालनाची सजावट राधा तापकीर व  घरटे  यांनी केली.  मुलांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान देणे खूप महत्त्वाचे आहे. पालकानी नियमाचे पालक केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला सर्व पालक वर्गाला दिला.

प्रा. प्रमोद बोऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांचा व गुरुजनांचा सन्मान करावा, वेळेला महत्त्व द्यावे, असे सांगितले. पालकांनी मुलाचे दोन तास अवांतर वाचन घेतले पाहिजे, असे सर्व पालकंना सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव  यादवेंद्र खळदे यांनी मुलांना अर्जुनाची कथा सांगितली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध खेळात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक बक्षीस देऊन करण्यात आले.

पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कल्पना गाडे व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  वर्षा गायकवाड यांनी केले. तसेच आदर्श बाल मंदिराचे विविध गुणदर्शन सूत्रसंचालन  छाया सोळंके यांनी केले पारितोषिक वितरणचे सूत्रसंचालन  मनीषा जाधव व आदर्श बाल मंदिरचे सूत्रसंचालन वाडेकर व आशा मुऱ्हे  यांनी केले.

दुपार सत्रातील विविध गुणदर्शन कार्यक्रमास सहसचिव.प्रा. वसंतराव पवार  उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कार्यक्रमास अनेक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास आदर्श ज्युनिअर कॉलेजचे संजय देवकर व आदर्श सिनियर कॉलेजचे  श्रीहरी मिसाळ  व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक  खामकर  तसेच पदमावती विद्या मंदिर, ऊर्से शाळेचे मुख्याध्यापक  केशव शेवकर (Talegaon Dabhade) उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=9qHaE71Wgmc

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.