Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी विद्याविभूषित व सक्षम मुख्याधिकारी नेमण्यात यावा-  मिलिंद अच्युत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी त्वरित सक्षम उच्च विद्या ( Talegaon Dabhade ) विभूषित, संस्कारिक मुख्याधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव नगर विकास खाते व जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदना मार्फत केली आहे.

Lonavala : लोणावळ्यात 12 जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन

मिलींद अच्युत यांनी म्हटले आहे की,  तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंतर्गत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही. तळेगाव दाभाडे शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे शहरातील कॉलनी अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत सर्वसामान्य नागरिक नगर परिषदेच्या खेट्या घालून कंटाळले आहेत .

पावसानंतर लगेचच काम सुरू करू असे आश्वासन देऊन देखील रस्त्यांची कामे दुर्लक्षितच आहेत. पावसाळ्यात अनेकदा विनवणी करून देखील रस्त्यांचे डागडूजी करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना चिखलाच्या साम्राज्यात दैनंदिन काम करताना नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे. तळेगाव शहरातील कचरा व्यवस्थापनाचा देखील भोंगळ कारभार असून घंटागाडी नियमित वेळेवर येत नाही तसेच ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य साठलेले दिसून येत आहे.

नागरिकांना पिण्याचे पाणी देखील नियमित व सुरळीत मिळत नाही अनेकदा तक्रार करून देखील पालिका प्रशासन गांभीर्यपूर्वक निर्णय घेत नाही, विद्यमान मुख्याधिकारी नागरी सुविधा पुरवताना अकार्यक्षम असल्याचा नागरिकांचा अनुभव असून उत्तम प्रशासकीय अनुभव असणारा व सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे तसेच नागरिकांशी सौजन्याने वागणारा उच्चभूषित व सुसंस्कृत असा मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी नेमण्यात यावा असे मिलिंद अच्युत यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात ( Talegaon Dabhade ) आलेले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.