Talegaon Dabhade : आमदार संजय बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत रविवारी मावळात भाजपची ‘विजयी संकल्प रॅली ‘

देहूरोड ते लोणावळा‘ हजारो मोटरसायकलसह कार्यकर्ते होणार सहभागी

एमपीसी न्यूज- मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, रविवारी (दि. ३) मावळ तालुक्यात भाजपच्या वतीने ‘विजयी संकल्प रॅली’ काढण्यात येणार आहे. हजारो मोटरसायकलसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत.

केंद्र व राज्य सरकारने जनहितासाठी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रदेश पातळीवरून विविध कार्यक्रम राबविण्याचे सूचित करण्यात आले आहे, त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही ‘विजयी संकल्प रॅली’ भाजपच्या वतीने काढण्यात येणार आहे.

मावळ तालुक्यात आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता पंडित नेहरू कार्यालय, देहूरोड येथून ही रॅली निघणार आहे. ही रॅली पूर्णपणे बाईक रॅली असून यात मतदारसंघातील हजारो मोटरसायकलसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.