Talegaon Dabhade : तळ्यातील जैविक साखळी परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील तळ्यातील जैविक साखळी परिपूर्ण व स्वयंभू होण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तलावात स्थानिक प्रजातींचे रोहू, कटला, मृगाल असे 5 हजारांहून अधिक मत्स्यबीज सोडण्यात आले. नगरपरिषद आणि रोटरीच्या वतीने हा उपक्रम राबविला जात असून यामुळे तळ्यातील जैविक साखळीला पोषक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत.

सन 2022 च्या वर्षाअखेरच्या दिवशी येथील नैसर्गिक महत्व लाभलेल्या इगलच्या जवळील तळयामध्ये स्थानिक प्रजातींचे   (रोहू,कटला, मृगाल) 5 हजारांहून अधिक मत्स्यबीज सोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष अनिश होले, प्रकल्प प्रमुख महेश महाजन, मत्स्यतज्ञ शशांक ओगले, डॉ. ज्योती मुंदर्गी, आणि ज्येष्ठ रोटेरियन यादवेंद्र खळदे सह रोटरीयन सदस्य उपस्थित होते.

Koregaon Bhima : कोरेगाव भीमा येथे लोटला जनसागर, जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुयायांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

तळेगावचे हे तळे 1983 पर्यंत स्थानिक व स्थलांतरीत विदेशी पक्षी यांनी गजबजलेले असायचे. या नंतर हळूहळू प्रदूषणाच्या विळख्यात हे तळे अडकले. या तलावाला त्याचे नैसर्गिक गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा मानस या योजनेतील या उपक्रमाव्दारे पार पडला. (Talegaon Dabhade) यानंतर ही आणखी मत्स्य बीज वेळोवेळी सोडण्यात येईल. येथील जैविक साखळी परिपूर्ण व स्वयंभू होण्यासाठी भविष्यात आवश्यक ते सर्व प्रयत्न रोटरी क्लब व नगरपरिषदे मार्फत केले जाणार आहेत.यासाठी नगर परिषदेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे मत मुख्याधिकारी सरनाईक यानी व्यक्त केले.यावेळी स्वागत सचिव कमलेश कारले यांनी केले. उपाध्यक्ष उद्धव चितळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.