Koregaon Bhima : कोरेगाव भीमा येथे लोटला जनसागर, जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुयायांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

एमपीसी न्यूज : भीमा कोरेगाव (पेरणे) येथे जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात सुरु झाला.भीम अनुयायांनी अभिवादनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. (Koregaon Bhima) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि  पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. 

जयस्तंभ अभिवादनासाठी अनुयायांनी पहाटेपासून गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाच्या उत्तम नियोजनमुळे अभिवादन सोहळा शिस्तीत सुरु आहे. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोहळा शांततेत पार पडावा यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहेत.

Dighi News : दिघी येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,तीन महिलांची सुटका

जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा केली असून आरोग्य पथकाद्वारे गरजूंना सेवा देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वतः परिसराला भेट (Koregaon Bhima) देऊन या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

पीएमपीएमएलने लोणीकंद आणि कोरेगाव भीमा अशा दोन्ही बाजूने प्रत्येकी 140 बसेस सुरू ठेवल्या असून बसेसच्या सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 2 हजार 800 फेऱ्या झाल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.

205 वा शौर्यदिन साजरा

पुणे जिल्ह्याच्या पेरणे (ता. हवेली) येथील कोरेगाव भीमा येथे आज 205 वा शौर्यदिन साजरा होत आहे. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सामूहिक बुध्द वंदना पठन करून शौर्यदिनाला सुरुवात झाली. मध्यरात्री पासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केलीये. भारतीय बौद्ध महासभा सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.  ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर, सचिन खरात यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिकांकडून सलामी आणि मानवंदना देण्यात आली. सकाळी 8 वाजल्यापासून सर्व अनुयायांसाठी अभिवादन स्थळ खुले करण्यात आले आहे.

शौर्यदिनानिमित्त मोठी गर्दी

दरम्यान, शौर्यदिनानिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मिळेल त्या गाडीने अनुयायांनी कोरेगाव येथे दाखल होत आहे. अनेकांनी घरुन आणलेला डबा जागा मिळेल त्याठिकाणी खात आहेत. आणलेली शिदोरी खात अनेक अनुयायी दिसत आहे. औरंगाबाद वरुन अनेक लोक दाखल झाले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे. कोरेगाव भीमा या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने वादळ वारा हा भीम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला. भीम शाहीर मेघानंद जाधव यांनी भीम गीत सादर केली.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य शासनाने समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणाची तयारी केली आहे. गृह विभागाने विविध सूचना निर्गमित केल्या नुसार कार्यक्रम सुरु आहे. डॉ. नारनवरे यांनी येणार्‍या सर्व अनुयायांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा ( Koregaon Bhima) परिसरात झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तेव्हापासून दरवर्षी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कडक पावले उचलत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.