Talegaon Dabhade : देशाच्या विकासात स्त्रियांचे योगदान मोलाचे – चंद्रकांत शेटे

एमपीसी न्युज – आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. याचे मूळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जीवनसंघर्षात आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना अगोदर शिक्षणाचे धडे दिले आणि त्यांनी शिक्षणाची गंगा स्त्रियांपर्यंत नेली. देशाच्या विकासात स्त्रियांचे योगदान मोलाचे आहे, असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे (Talegaon Dabhade) कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयामध्ये (Talegaon Dabhade) अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत शेटे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. दीप्ती पेठे, व्याख्याते प्रा.सत्यजित खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune News : बंडगार्डन येथे 16.32 लाख रुपये किंमतीचा 1 किलो 88 ग्राम चरस जप्त; दोघांना अटक

यावेळी महाविद्यालयात 12 वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ऐश्वर्या पवार या विद्यार्थीनीने ‘मी सावित्रीबाई’ हे  एकपात्री नाट्यप्रयोग (Talegaon Dabhade)सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या समग्र जीवनचरित्राचा आढावा घेताना  चंद्रकांत शेटे पुढे म्हणाले की, साधारण दोनशे वर्षांपूर्वीची परिस्थिती नजरेसमोर आणावी, तो काळ स्मरावा आणि मग तत्कालीन सावित्रीबाई फुलेंनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व आपल्याला लक्षात येईल.

यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे बोलताना म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवनपट हाच आदर्शवादी आहे. एखादी स्त्री किती मोठा त्याग करू शकते याचे उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत.
सावित्रीबाई फुलेंनी ज्या कठोर संघर्षाला स्वीकारून आपले कार्य सुरू ठेवले तो संघर्ष आजच्या युवक युवतींनी लक्षात घ्यायला हवा असे म्हणत,महाविद्यालयात (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांना शिक्षण देताना आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविताना सावित्रीबाई फुलेंसारखे आदर्श जर विद्यार्थ्यांना शिकविले तर अनेक संस्कारी पिढ्या समृद्ध भारतासाठी आपले योगदान देतील ,असा आशावाद प्राचार्य डॉ. मलघे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना प्रा. खांडगे म्हणाले, सावित्रीबाई फुलेंच्या जीवनसंघर्षांचा अभ्यास ‘सामाजिक लिंगभावा’च्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. एक स्त्री पुढे येऊन मुलींना शिकविते ही बाबच तत्कालीन समाजाला न रुचणारी होती म्हणून सावित्रीबाई फुले यांना मोठ्या संघर्षातून वाट काढावी लागली आणि हे तत्कालीन समाजव्यवस्थेचे अपयश म्हणावे लागेल, असे प्रा.खांडगे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. दीप्ती पेठे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तीमत्वाचे विविधांगी पैलू समोर आणले. उत्तम साहित्यिक, उत्तम पालक, उत्तम वक्त्या आशा अनेक गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत पेठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला.या प्रसंगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. अर्चना जाधव यांनी आपले विचार मांडले. (Talegaon Dabhade)तसेच इंग्रजी विभागाच्या प्रा. छाया काशीद यांनी ‘साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल’ ही शाहीर शीतल साठे यांची कविता गाऊन सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्वसामान्य स्त्री वर्गाला शिक्षणाची कवाडे खुली झाली आणि हे उपकार कधीही न फिटणारे आहेत असे डॉ.बोराडे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे प्रा.ज्ञानेश्वर काकडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.