Wakad : वकिलाचा खून करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज : काळेवाडी येथून वकीलाला (Wakad) अपहरण करून त्याचा खुन करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व आरोपी वाकड पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Talegaon Dabhade : देशाच्या विकासात स्त्रियांचे योगदान मोलाचे – चंद्रकांत शेटे

शिवशंकर दत्तात्रय शिंदे या वकिलाचा अपहरण करून खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे वकील असून काळेवाडी पिंपरी पुलाजवळ त्यांचे कार्यालय आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी शिंदे हे बेपत्ता झाले. शोध घेऊनही ते न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी वाकड पोलीस (Wakad) ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.