Talegaon Dabhade : श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल हर्षल पंडित यांचे स्वागत

एमपीसी न्यूज – मागील 14 वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी स्माईल व्यसनमुक्ती केंद्राच्या (Talegaon Dabhade) माध्यमातून सक्रिय असलेले हर्षल पंडित यांना श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबद्दल रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे यांनी हर्षल पंडित यांचे स्वागत केले. पंडित हे व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

गेली 14 वर्षे सातत्याने व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत असणारे हर्षल पंडित यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कार’ प्राप्त झाल्याने रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव वर्ष 461 च्यानिमित्त श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Hadapsar : ‘मला भाई का नाही म्हणत”, जाब विचारत तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार

मावळ तालुक्यात उर्से येथे 80 रुग्ण क्षमतेचा ‘स्माईल व्यसनमुक्ती केंद्र’ हा निवासी प्रकल्प सुरू केला आहे. उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हर्षल पंडित यांस श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यास मुख्य सचिव मंदार जगन्नाथ देव महाराज, विश्वस्त जितेंद्र देव, हभप आनंद विश्वनाथ तांबे, अ‍ॅड.राजेंद्र बाबूराव उमाप, विनोद पोपटराव पवार हे (Talegaon Dabhade) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.