Talegaon Dabhade : माय मराठीच्या समृद्धीसाठी मराठीचा आग्रह धरा – प्रा. सत्यजित खांडगे

एमपीसी न्यूज – माय मराठीच्या समृद्धीसाठी मराठी भाषेचा आग्रह धरायला (Talegaon Dabhade) हवा. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने मराठी भाषेतच बोलले पाहिजे. मराठी भाषेतील पुस्तकांचे भरपूर वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्रा. सत्यजीत खांडगे यांनी केले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रा. खांडगे बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले होते. तर यावेळी व्यासपीठावर उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, सोनबा गोपाळे गुरूजी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते

यावेळी बोलताना प्रा.खांडगे म्हणाले की, शासकीय कार्यालयात प्रशासनातील प्रत्येकाने मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे.

माझी वसुंधरा अभियानाचे अंतर्गत यावेळी वृक्षवाटप व पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. वरिष्ठ अधिकारी रविंद्र काळोखे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले. तर उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी आभार मानले.

Today’s Horoscope 28 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.