Alandi : पथदिवे बंद असल्याने माऊली पार्कमध्ये काळोखाचे साम्राज्य

एमपीसी न्यूज : आळंदी येथील माऊली पार्कसह (Alandi) लगतच्या साई सागर हॉटेल जवळील एका गल्लीमध्ये पथदिवे रात्रीच्या वेळी बंद अवस्थेत दिसून येत आहेत. माऊली पार्क येथील सर्व गल्ल्यामध्ये 3 ते 4 दिवस तेथील विद्युत खांबावरील पथदिवे बंद अवस्थेत असून रात्रीच्या वेळी त्या गल्ल्यामध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.

त्यामुळे नागरिकांना येथील रस्त्यावरून चालण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रात्रीच्या वेळी तेथील काही कुत्र्यांचा घोळका या रस्त्यावर असतो. अंधाराच्या वेळेस कुत्रे नागरिकांवर धावूनही येतात. त्यामुळे काही नागरिकांना अंधाराच्या वेळी बाहेर पडण्यासही भीती वाटत आहे. तसेच या अंधाराचा गैरफायदा घेत एखादा गैरप्रकार (चोरी,लूटमार) घडण्याचीही भीती नागरिकांडून व्यक्त होत आहे.

याची दखल संबंधित विभाग प्रशासनाने घेऊन येथील विद्युत खांबावरील पथदिवे चालू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Pune News : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मविआचे रवींद्र धंगेकर आणि रुपाली ठोंबरेंविरुद्ध गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.