Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षपदी राहुल खळदे

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या (Talegaon Dabhade) अध्यक्ष पदाचा रो. राहुल खळदे यांनी पदभार स्वीकारला. क्लबचे ते 15 वे अध्यक्ष आहेत. सन 2023-24 या रोटरी वर्षात समाजहिताचे प्रकल्प राबविणार असल्याचा मनोदय खळदे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131, रोटरी वर्ष 2025-26 चे प्रांतपाल रो. संतोष मराठे, उपप्रांतपाल रो. विनय भुजबळ उपस्थित होते.

कार्यक्रमाला सर्व रोटरीयन्स व बहुसंख्येने अनेक प्रतिष्ठित मान्यवर यावेळी या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष रो संतोष खांडगे यांनी केले. त्यांनी क्लबचा इतिहास सर्वांपुढे मांडला.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे वर्ष 2022-23 चे अध्यक्ष रो विल्सन सालेर यांना सन्मान चिन्ह देऊन मागील वर्षाच्या कार्यकाळाबद्दल सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष रो संतोष मराठे यांच्या हस्ते करण्यात आला व तसेच रोटरी वर्ष 2022-23 चे सचिव रो मिलिंद शेलार यांचाही सन्मानचिन्ह देऊन रोटरी डिस्टिक- 3131 चे उपप्रांतपाल रोटेरियन विनय भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नूतन अध्यक्ष रोटेरियन राहुल खळदे यांनी मागील अध्यक्ष रो विल्सन सालेर यांच्याकडून रोटरी नवीन वर्षाचा (वर्षासाठी) पदभार स्वीकारला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले. यावेळी या यावर्षीचा क्लबचा रोटरी वेरा अवॉर्ड समाजातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तळेगावातील नयना डोळस यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. समाजातील उत्तुंग कार्याबद्दल त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले त्यांनी आपल्या भाषणात त्यांनी त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती दिली .

यावर्षीची विशेष बाब म्हणजे रोटरी युथ एक्सचेंज प्रोग्रॅमच्या माध्यमातून रोटरीचे नूतन सचिव रो सुनील खोल्लंम यांची कन्या कु संस्कृती सुनील खोल्लम ही अमेरिकेला (Talegaon Dabhade) एक वर्षासाठी शिकण्यासाठी जात असून यावेळी तिला क्लबचा झेंडा अमेरिकेत नेण्यासाठी तिला प्रदान करण्यात आला .

Chandrayaan 3 : उद्या होणार पृथ्वीजवळील अखेरच्या कक्षेत यानाचा प्रवेश

क्लबचे नूतन अध्यक्ष रोटेरियन राहुल खळदे यांनी आपल्या भाषणात पुढील वर्षातील समाज उपयोगी प्रोजेक्ट बाबत संपूर्ण माहिती दिली व क्लबच्या वतीने त्यांना जी संधी देण्यात आली त्याचे अभिमानास्पद मोठे कार्य करून त्याचे सोनं करू असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो लक्ष्मण मखर व माजी अध्यक्ष रो सुमती निलवे यांनी केले तसेच रोटरी क्लबचे नूतन उपाध्यक्ष रो मिलिंद शेलार यांनी सर्वांच्या वतीने आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.