Talegaon Dabhade : ग्रामपंचायतींच्या विकासात सहभाग घेणा-या सरपंचांचा होणार सन्मान

एमपीसी न्यूज – गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणा-या सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत सोमाटणे ग्रामपंचायतीचे सदस्य व श्री घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष नितीन मु-हे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष संतोष मुऱ्हे यांनी माहिती दिली. प्रत्येक गावात जाऊन गावच्या विकासात सहभाग घेतलेल्या आजवर गावासाठी काम केलेल्या सरपंचांना मु-हे परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याची सुरुवात उर्से गावापासून होणार असल्याचेही मु-हे बंधूंनी सांगितले.
पत्रकारांच्या वार्तालाप कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. आतापर्यंत गावपातळीवर, ग्रामपंचायत, पंचायत समिती पातळीवर विविध विकास कामे करताना सतत अग्रेसर राहीलो आहे. जिल्हा परिषदेवर संधी मिळाली तर तिथपर्यंतही काम करण्याची तयारी असल्याचे मु-हे म्हणाले.

यावेळी सोमाटणे ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन मु-हे, राष्ट्रवादीचे युवा नेते राकेश घारे, उर्से ग्रामपंचायतीचे सदस्य सुधीर बराटे, अक्षय मु-हे, सचिन निवृत्ती मु-हे, दिवाडचे उपसरपंच सुनील सावळे,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विक्रम बोडके आदी उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=L_R7hIF0p1Q
नितीन मु-हे, संतोष मु-हे यांनी सांगितले की, पवन मावळातील पहिल्या 20 ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा सन्मान करण्यात येईल. प्रत्येकाला सन्मान चिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आदींच्या प्रतिमा देऊन व गुण गौरव मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

या सरपंचांनी ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून गावातील पाणी पुरवठा, रस्ते, वीज, सांडपणी, शाळा, आरोग्य आदी विकास कामांवर योगदान दिलेले आहे. त्यामुळे त्यांचा गावाच्या विकासात मोलाचा वाटा असल्यामुळे हा सत्कार करण्यात येणार आहे. या सरपंच सन्मान उपक्रमाची सुरूवात उर्से ग्रामपंचायतीपासून होणार आहे. वडगाव मावळ येथे सोमवार (दि 31) आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उर्से ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचांचा सत्कार होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.