Talegaon Dabhade : जिल्हा स्तरीय नृत्य स्पर्धेत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक चार व पाचला यश

एमपीसी न्यूज – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत (Talegaon Dabhade)सर्व शासकीय आश्रम शाळा,जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद शाळा,समाजकल्याण, नवोदय विद्यालय व केंद्रीय विद्यालय यांची जिल्हा स्तरीय नृत्य स्पर्धा पुणे येथे पार पडली. यामध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार या शाळेला प्रथम तर वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक पाच या शाळेला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2023-24अन्वये भूमिका (Talegaon Dabhade)अभिनय व लोकनृत्या स्पर्धा या शिर्षकांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत सर्व शासकीय आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा,नगरपरिषद शाळा,समाजकल्याण,नवोदय विद्यालय व केंद्रीय विद्यालय यांची जिल्हा स्तरीय स्पर्धा क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले सभागृह,गंजपेठ, पुणे या ठिकाणी दि 06ऑक्टोबर रोजी पार पडली.

Bhosari : पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

या स्पर्धेतील लोकनृत्य या प्रकारामध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्र. 4 व वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्र. 5 या शाळांनी सहभाग नोंदविला होता.
सदर स्पर्धेमध्ये दोन्हीही शाळांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर आधारित लोकनृत्य सादर
केले.

सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्र. 4 या शाळेच्या विद्यार्थीनींचा प्रथम क्रमांक आला तर वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्र. 5 शाळेच्या विद्यार्थीनींनीचा तृतिय क्रमांक आला.

सर्व यशस्वी विद्यार्थीनी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व शाळांच्या मुख्याध्यापकांचे तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांच्या वतीने अभिनंदन करून कौतुक करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.