Talegaon Dabhade : ह भ प शिवाजी आप्पा वारींगे यांचे निधन

एमपीसी न्यूज : वारंगवाडी गावचे वारकरी संप्रदायाचे (Talegaon Dabhade) व प्रगतशील शेतकरी  शिवाजी (आप्पा) घमाजी वारींगे (वय 65) यांचे गुरूवारी (दि 12) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मंगरूळ – गोळेवाडी रस्त्यावर अपघाती निधन झाले. 

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, बहीण, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आज दुपारी दोनच्या सुमारास ते मंगरूळवरून घराकडे येत असताना त्यांची दुचाकी व मालमोटारीचा अपघात झाला. त्या अपघातात ते जागीच ठार झाले. त्यांचे बरोबर हभप गेणभाऊ नखाते हे जखमी झाले.

Alandi : वेदश्री तपोवनात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

हाॅटेल व्यावसायिक नवनाथ वारींगे व आंबळे विविध कार्यकारी (Talegaon Dabhade) सेवा सोसायटीचे सचिव दत्तात्रय वारींगे यांचे ते वडील तर शिक्षक नेते पिराजी वारींगे यांचे ते चुलते आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम यांचे ते मामा होत.

आज सायंकाळी 6.30 वा वारंगवाडी येथील इंद्रायणी नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.