Talegaon Dabhade : रिक्षा चालकांनी लावलेल्या झाडांची कत्तल

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौकात (Talegaon Dabhade) रिक्षा चालकांनी प्रवाशांना सावली मिळावी यासाठी मागील काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या बाजूला झाडे लावली आहेत.सर्व झाडांची निगा रिक्षा चालकांकडून राखली जात आहे.मात्र गुरुवारी(दि.14)मध्यरात्री अज्ञातांनी यातील तीन झाडांची कत्तल केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी दिली. प्रशासनाने याबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तळेगांव दाभाडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारुती मंदिर चौकात असलेल्या रिक्षा स्टॅन्डच्या सदस्यांनी बस थांबा नसल्याने प्रवाश्यांना सावली मिळावी या हेतूने आठ दहा झाडे काही वर्षांपूर्वी लावली व त्यांची निगा राखून वाढवली.

त्यातील तीन पूर्ण वाढ झालेली झाडे काल रात्री अज्ञातांनी कापून काढली आहेत. तळेगांव दाभाडे प्रशासकीय इमारतीच्या (Talegaon Dabhade) भिंतीशेजारच्या या झाडांची नक्की कुणाला अडचण होती हे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे पाहून चौकशी करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.

PCNTDA : प्राधिकरण परताव्याचा जीआर निघाला

या झाडांची कुणाला अडचण होती? हे फोटो आणि व्हिडीओत स्पष्ट दिसते आहे. या भिंतीला लागून अनेक मोठमोठे अनधिकृत बॅनर लावलेले असतात त्यामुळे दुकाने झाकली जातात, दुकानाच्या पाट्या झाकल्या जातात त्याविषयी खंत आहे; मात्र तक्रार नाही.

त्यांना हात लावायची यांची हिम्मत नाही म्हणून सजीव झाडांची रात्रीच्या वेळी कत्तल अज्ञातांनी केली असावी.याचा तपास करून प्रशासनाने झाडे लावा झाडे वाचवा! ही घोषणा खरी करून दाखवावी. असेही डोळस यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.