Talegaon Dabhade : मावळचे शिलेदार सुनील शेळके उद्या 25 हजार जनतेच्या साक्षीने भरणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – मावळचे शिलेदार आणि तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके हे उद्या (गुरुवारी) तालुक्यातील 25 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या साक्षीने मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सुनील शेळके हे भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत मावळ मतदारसंघाबाबतचा निर्णय जाहीर न करून पक्षनेतृत्वाने परिवर्तनाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे सुनील शेळके यांनाच भाजपची अधिकृत उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वडगाव मावळ येथील पंचमुखी मारुती मंदिराजवळ उद्या (गुरुवारी) सकाळी नऊ वाजता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, वारकरी संप्रदाय, माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य व सहकारी मित्रांनी हजारोंच्या संख्येने जमावे. त्या ठिकाणी जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेऊन मिरवणुकीला सुरूवात होईल.

तरी सर्वांनी तालुक्यातील परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुनील शेळके यांनी केले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनाची तयारी सुनील शेळके समर्थकांकडून करण्यात आली आहे. मिरवणुकीत वारकरी भजनी मंडळे, ढोल-ताशांची पथके, बैलगाड्या तसेच विजयरथ असणार आहे. महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मिरवणूक 11 वाजता सभास्थानी पोहचणार असून सुनीलआण्णा दुपारी 11 ते 12 या वेळेत उपस्थित जनसागराला संबोधित करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.