Talegaon News : शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या आरोग्य तपासणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे – आमदार सुनील शेळके

एमपीसीन्यूज : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत आरोग्य आरोग्य तपासणी होऊन सुद्धा ज्यांना पुन्हा तपासणी करावयाची असेल तसेच ज्या नागरिकांची तपासणी होऊ शकली नाही त्या तळेगाव स्टेशन भागातील नागरिकांनी संत ज्ञानेश्वर शाळा क्रमांक 6 येथे, तर गावभागातील नागरिकांनी थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळा येथे शुक्रवारी ( दि. 25) व शनिवारी ( दि. 26) या दिवशी सकाळी नऊ ते पाच या वेळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या राज्य शासनाच्या आरोग्य मोहीमेचा पहिल्या टप्प्यात आज गुरुवार, दि. 24 रोजी तळेगाव दाभाडे शहरात नियोजनबद्ध आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

या आरोग्य मोहिमेत प्रांत, तहसीलदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सामाजिक स्वयंसेवी संस्था व इतर सर्व सहकारी यांनी सामाजिक दायित्व म्हणून सहभागी होऊन मोहीम यशस्वीपणे पार पाडली. त्याबद्दल या सर्वांचे आमदार शेळके यांनी आभार मानले.

तसेच तपासणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना त्यांनी शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या मोहिमेत स्वतःची तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.