Talegaon News : मशीनचा नट-बोल्ट, रिम तुटून डोक्यात लागल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मशीनचा नट-बोल्ट, लोखंडी रिम तुटून डोक्याला लागल्याने कामगाराचा मृत्यू झाला. नवलाख उंब्रे येथील शिवम इंडस्ट्रीज कंपनीत 15 एप्रिल 2022 रोजी हा अपघात झाला.

 

पोलीस नाईक सुरेश परशुराम जाधव यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ सुधाकर कर्पे (वय 30, रा. नवलाख उंब्रे, मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी मयत कामगार रामदास याला सिंमेट पाईप बनविण्याच्या मशीनचे कोणतेही प्रशिक्षण न देता मशीनवर कामाला लावले. मशीनचे वेळेवर सर्व्हिसिंग नसल्याने रनर मशीनचा नट बोल्ट आणि लोखंडी रिम तुटला व रामदास यांचा डोक्याला लागला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रामदास यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.