Talegaon : वृद्ध महिलेस दुचाकीची धडक

एमपीसी न्यूज – वृद्ध महिलेला भरधाव दुचाकीने जोरात धडक (Talegaon )दिली. त्यामध्ये वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता तळेगाव स्टेशन रोडवर घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon )फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश प्रकाश लाले (वय ४४, रा. परंदवडी रोड, मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rajya Sabha Election : भाजपच्या राज्यसभा उमेदवारीत मागून येऊन अशोक चव्हाण यांची वर्णी; पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आजी या फिर्यादी यांच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. शाळेत सोडून येत असताना काका हलवाई दुकानासमोर एका दुचाकीने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी यांच्या आजी गंभीर जखमी झाल्या आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.