Talegaon : सुदवडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज – सुदवडीचे माजी सरपंच तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत मोईकर आणि राष्ट्रवादीचे मावळ तालुका माजी प्रसिद्धीप्रमुख गजानन कराळे पा. यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, कामगार, मदत, व पुनर्वसन राज्यमंत्री नामदार संजय (बाळा) भेगडे, मावळ भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, संदीप काशीद यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

माजी उपसरपंच संभाजी मोईकर, मच्छिन्द्र कराळे पा., अशोक कराळे पा., माजी ग्रामपंचायत सदस्य रतन मोईकर, माजी शिक्षण कमिटी अध्यक्ष नंदू मोईकर, सागर मोईकर, उद्योजक अक्षय मोईकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा वडगाव मावळ येथील भाजप कार्यालयात पार पडला.

_MPC_DIR_MPU_II
  • याप्रसंगी जगन्नाथ शेवकर, मधुकर ढोरे, उद्योग आघाडी अध्यक्ष संदीप पवार, सुदवडीच्या सरपंच रंजना शेंडे, सदानंद टिळेकर, बाळासाहेब कराळे पा., संजय मोईकर, भाजप अध्यक्ष मोहन तांबे, मावळ भाजप युवामोर्चा उपाध्यक्ष संजय गाडे, माजी उपसरपंच बाळासाहेब गाडे, वसंत कराळे, माजी उपसरपंच बाळासाहेब शेंडे, रामदास मोईकर, बाळासाहेब वाळुंजकर, किसन जंबुकर, संतोष तांबे, अॅड सोपान कराळे, बूथ कमिटी अध्यक्ष शरद मोईकर, गणेश जंबुकर, भाऊसाहेब बाळसराफ आदी उपस्थित होते.

प्रवेश केलेले हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय सहभागी होते. राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या कामाच्या झंझावाताने प्रभावित होऊन सर्वांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.