BJP : महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचे भाजपला टार्गेट – धीरज घाटे

एमपीसी न्यूज  : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (BJP) महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी आज दिली. भारतीय जनता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक नागपुर येथे आयोजित करण्यात आली होती.

या महत्वपूर्ण बैठकीसाठी सर्व 36 जिल्ह्यांचे अध्यक्ष सहभागी झाले होते. पुणे शहर भाजप अध्यक्ष या नात्याने या महत्वाच्या बैठकीत घाटे यांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सरचिटणीस विनोद तावडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश नेते मंडळींनी दिले.

Alandi : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीमध्ये आरोग्य शिबीर संपन्न

तसेच संघटना मजबूत करणे, आगामी काळातील कार्यक्रम पक्षाचे यशस्वी करणे, यावरही चर्चा करण्यात आल्याचे धीरज घाटे म्हणाले. यावेळी पुण्यातून माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, राघवेंद्र मानकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.