Today’s Horoscope 17 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 17.12.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस. 

आज विशेष – धनुर्मासारंभ.

राहू काळ – सायंकाळी4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – धनिष्ठा.

चंद्र राशी – मकर 15.45 पर्यंत नंतर कुंभ.

—————————–

मेष   ( शुभ रंग – मोरपंखी )

आज पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात थोरामोठ्यांशी काही वैचारिक मतभेद होतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

वृषभ  ( शुभ रंग- निळा)

आज दिवसाचा पूर्वार्ध मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी तितकासा अनुकूल नाही. दुपारनंतर कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. घरात वडीलधाऱ्यांची मने जपाल.

मिथुन  ( शुभ रंग- डाळिंबी)

महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. दुपारनंतर दिवस तितकाचा अनुकूल नाही. नवीन ओळखीत फक्त रामराम करा कोणतेही आर्थिक व्यवहार नकोत.

कर्क  ( शुभ रंग – आकाशी)

धंद्यात येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. वैवाहिक जीवनात आज दुपारनंतर सुसंवाद घडेल.

सिंह  ( शुभ रंग – राखाडी)

आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो.

कन्या   ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेमीयुगुलां मध्ये सुसंवाद असेल. स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार मार्गी लागतील.

तूळ  ( शुभ रंग- पांढरा)

प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चा जास्त कराल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल.

वृश्चिक  ( शुभ रंग – भगवा)

आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. प्रवासात जुळलेले नवे हितसंबंध भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

धनु  (शुभ रंग- क्रीम)

आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात काही विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. सुसंवाद गरजेचा राहील.

मकर ( शुभ रंग – जांभळा)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.

कुंभ (शुभ रंग- गुलाबी)

आज तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल दिवस असून बऱ्याच दिवसापासून ची काही रखडलेली कामे गती घेतील. बँकेकडून कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. मित्र तुमचा शब्द झेलतील.

मीन ( शुभ रंग- मोतिया)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदबीने वागतील. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.