Mpc News Vigil : वर्षभरात 28 पोलिसांवर हल्ले; इतर सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या 27 घटना

एमपीसी न्यूज – पोलीस हा घटक समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबत ( Mpc News Vigil ) आहे. समाजात कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर नागरिक थेट पोलिसांची मदत घेऊ शकतात. पण नागरिकांना सुरक्षा देणारे, त्यांच्या अडचणीत मदत करणारे पोलिसच असुरक्षित झाल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झाले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात तब्बल 28 पोलिसांवर हल्ले झाले आहेत. तर इतर सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या सात घटना घडल्या आहेत.

अनेकजणांना पोलीस दिसताच मनात भीती, कपाळावर आठ्या येतात. आता पोलीस काहीतरी कारवाई करणार, अशी उगाच नागरिकांच्या मनात भीती असते. पण हे पोलीस समाजाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावतात. वाहतुकीच्या व्यवस्थापनापासून, मंत्र्यांच्या सुरक्षा, शहर, गाव वस्त्यांवर गस्त, किरकोळ चोरट्यांपासून मोठमोठ्या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस कार्यरत असतात. पण समाजाची सुरक्षा करणारे पोलिसच आज सुरक्षित राहिलेले नाहीत.

Today’s Horoscope 17 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

ऑगस्ट महिन्यात पहाटेच्या वेळी चिंचवड परिसरात गस्त घालत असलेल्या एका होमगार्डवर हल्ला झाल्याची घटना घडली. चोरीची दुचाकी असल्याच्या संशयावरून संबंधित होमगार्ड दुचाकीचा पाठलाग करत होता. त्यावेळी दुचाकीवरील दोघांनी पळून जात असताना होमगार्डला मारहाण करून पळ काढला होता.

रस्त्याने विनाकारण फिरताना पोलिसांशी हुज्जत घालून धिंगाणा घातल्याचा देखील घटना घडल्या आहेत. किरकोळ शाब्दिक वाद करता करता पोलिसांना धक्काबुक्की करत बेदम मारहाण देखील झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या बाबतीत वादावादीचे प्रकार सातत्याने घडतात. वाहतुकीचे नियम मोडायचे आणि नंतर पोलिसांसोबत हुज्जत घालणारे महाभाग देखील शहरात आहेत. दोघांनी तर हद्दच केली. थेट वाहतूक पोलिसाला हद्द सांगून हुज्जत घालत ‘इथल्या पोलिसांना मी सरळ केलंय’ अशी थेट धमकी दिल्याचा प्रकार पुनावळे येथे घडला आहे.

पोलिसांप्रमाणेच इतर सरकारी खात्यामध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी देखील अनेक वेळेला नागरिकांच्या रोषाला बळी पडतात. वर्षभरात सात सरकारी नोकरांवर हल्ले झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. या सातही घटनांमधील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात 28 पोलिसांवर हल्ले झाले. पोलिसांवर हल्ले करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्या सर्व गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी थेट कारागृहात केली. वर्षभरात सरकारी नोकरांवरील हल्ल्याच्या एकूण 55 घटना घडल्या आहेत. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी 47 पोलिसांवर तर 15 अन्य सरकारी कर्मचा-यांवर असे एकूण 62 प्रकार घडले ( Mpc News Vigil ) होते.

 

अकरा महिन्यात झालेले हल्ले –

पोलीस                  इतर       सरकारी कर्मचारी
जानेवारी                    2                         2
फेब्रुवारी                     1                          1
मार्च                          1                          4
एप्रिल                        7                          1
मे                             4                          3
जून                           2                         3
जुलै                          2                         1
ऑगस्ट                     3                         5
सप्टेंबर                      3                         1
ऑक्टोबर                   0                         2
नोव्हेंबर                     3                          3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.