Tata Motors News : टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या वॉरंटी आणि फ्री सर्विस कालावधीत वाढ 

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या वॉरंटी आणि फ्रि सर्विस कालावधीत वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे टाटाच्या ग्राहकांना वॉरंटी आणि फ्रि सर्विस यासारख्या सेवांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे टाटाने ज्या ग्राहकांचा वॉरंटी आणि फ्रि सर्विस कालावधी 1 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत समाप्त होत आहे, त्या ग्राहकांचा वॉरंटी आणि फ्रि सर्विस कालावधी 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 

 

_MPC_DIR_MPU_II

टाटा मोटर्सच्या ग्राहक सेवा विभागाच्या प्रमुख डिम्पल मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सर्व्हिसिंगसाठी गाड्या अधिकृत सेंटरवर पाठवणे कठीण झाले आहे. अशात ग्राहकांच्या गाडीचा वॉरंटी आणि फ्रि सर्विस कालावधी समाप्त होत आहे. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेऊन टाटा मोटर्सने वॉरंटी आणि फ्रि सर्विस कालावधीत 30 जून 2021 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.’

टाटा मोटर्सने आपले ग्राहक, विक्रेते आणि पुरवठादारांच्या हिताचे संरक्षण व सेवा करण्यासाठी सर्वसमावेशक ‘बिझिनेस चपलता योजना’ आणली आहे. टाटा मोटर्सचे संबंध भारतात 400 पेक्षा अधिक ठिकाणी 608 अधिकृत सर्व्हिस सेंटर आहेत. प्रवासी वाहनांचे ग्राहक आपात्कालीन परिस्थितीत 1800 209 8282 या नंबरवर संपर्क करु शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.