Technology News : टेलिग्राम ठरले 2021 चे सर्वाधिक डाऊनलोड होणारे अ‍ॅप

एमपीसी न्यूज : नव्या अटी आणि शर्तींसह प्रायव्हसी पॉलिसी व्हॉट्सअॅपने सादर केली आहे. या अटी-शर्ती जर तुम्ही अमान्य केल्या तर तुमचे अकाऊंट डिलीट केले जाईल. कंपनीने या अटी मान्य करण्यासाठी युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. अनेक युजर्स व्हॉट्सअॅपच्या या नव्या धोरणामुळे नाराज आहेत.

त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या या अटी मान्य करण्याऐवजी व्हॉट्सअॅप वापरणे बंद करण्यास अनेकांनी प्राधान्य देण्याचे ठरवल्यामुळे त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. त्यातही बहुतांश युजर्स हे त्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करुन टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा व्हॉट्सअॅपला जोरदार फटका बसला आहे.

आपल्या गोपनीयता धोरणाबाबत व्हॉट्सअ‍ॅपने आतापर्यंत दोन वेळा स्पष्टीकरण दिले आहे. तसेच युजर्सचा डेटा कोणासोबतच शेअर केला जाणार नसून सर्व डेटा सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण देऊन व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्संना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु लोक गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन सिग्नल किंवा टेलिग्राम अ‍ॅपवर शिफ्ट होत असल्यामुळे या महिन्यात नव्याने अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याच्या बाबतीत व्हॉट्सअ‍ॅप पिछाडीवर आहे. तर टेलिग्राम आणि सिग्नल या दोन अ‍ॅप्सनी बाजी मारली आहे. या दोन्ही अ‍ॅप्सना युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टेलिग्राम जानेवारी 2021 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केले जाणारे नॉन गेमिंग अ‍ॅप ठरले आहे. जगभरातील टेलिग्रामच्या एकूण डाऊनलोड्सपैकी 24 टक्के डाऊनलोड्स हे भारतातून झाले आहेत. याबाबतचा खुलासा सेंसर टॉवरच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जगभरात गेल्या महिन्यात (जानेवारी) 63 मिलियन्स (6.3 कोटी) वेळा टेलिग्राम डाऊनलोड करण्यात आले आहे. यापैकी 15 मिलियन्स (1.5 कोटी) डाऊनलोड्स एकट्या भारतात झाले आहेत. टीक-टॉकने सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या नॉन गेमिंग अ‍ॅप्सच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.

जरी भारतात टीक-टॉक बॅन असले तरी जगभरात या अ‍ॅपला चांगलीच पसंती मिळत आहे. टिकटॉकनंतर सिग्नल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या अ‍ॅप्सचा अनुक्रमे तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक लागतो. सेंसर टॉवरच्या लेटेस्ट ब्लॉग पोस्ट, टॉप अ‍ॅप्स वर्ल्डवाईड फॉर जानेवारी 2021 2021 मध्ये दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपसह टीक-टॉक, सिग्नल आणि फेसबुकला टेलिग्रामने मागे टाकले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.