Pune : दस-याच्या खरेदीचा बहाणा करून दागिने चोरून नेणा-या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – दस-याच्या  निमित्ताने  सोने खरेदीचा बहाणा करून हातचालाखीने दूकानातील दागिने चोरणा-या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. ही घटना काल गुरूवारी (दि.18) सायंकाळी सातच्या दरम्यान खडकी बाजार येथील राठोड ज्वेलर्स येथे घडली.

याप्रकरणी विनोद राठोड (वय 38, रा. औंध रोड) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानात काल संध्याकाळी दोन महिला दस-याच्या  निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन त्या दोघींनी आपापसात संगनमत करून हातचालाखीने दूकानातील सोन्याची चैन आणि ब्रेसलेट असे एकूण 41 हजारांचे दागिने चोरले व त्याच्याजागी बेनटेक्सचे नकली दागिने ठेवून जात असताना फिर्यादीला काही अंतरावरच पोलिसांची जीप दिसताच घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर ताबडतोब पोलिसांनी कारवाई करत त्या दोन्ही महिलांना दागिन्यांसह ताब्यात घेतले.

याप्रकरणी पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.