Pune : ‘त्या’ पाचही अटक आरोपींचे माओवादी संघटनांशी कनेक्शन

पुणे पोलिसांचा दावा

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी काल (दि. 28) अटक केलेल्या पाचही आरोपींचे बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध होते, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. त्याबाबतचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचेही पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी आज (दि.29) पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

 

वरावरा राव (हैदराबाद), वेरनोन गोन्सालविस, अरुण पाररिया (मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड), गौतम नवलाखा यांचा बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय या बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप ठेवत काल (दि.28) अटक करण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पोलीस उपायुक्त म्हणाले की, या पाच आरोपींकडून पेन ड्राईव्ह, हार्डडिस्क, पत्रे आणि अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली असून यावरून ते सीपीआय या बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी कबीर कला मंच, सीपीआय माओवादी संघटनांकडून निधी पुरवण्यात आला होता. शिवाय सरकारविरोधात कृत्य करण्याचे पुरावेही आढळून आले आहेत. भीमा-कोरेगाव हिंसाचारात अटक केलेल्या पाचही जणांचा सहभाग असल्याचा दावाही करण्यात आला. याच पाच जणांवर विद्यार्थ्यांना भडकवणे, शस्त्र जमा करणे, त्यातून दहशतवादी कारवाया करण्याची जबाबदारी होती. शिवाय देशातल्या महत्वाच्या नेत्यांवर हल्ला करण्याची तयारीही केली जात होती, असेही सरदेशपांडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.