Baramati News : तोल गेला अन् एसटीखाली सापडला, तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : बारामती शहरातील इंदापूर चौकात तोल जाऊन एसटीखाली सापडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. अनिल सावळा काळे (वय 25, रा.अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

अनिल काळे हा वडिलांसोबत फळे खरेदी करीत असताना अचानक मागे वळला व त्याचा तोल गेला. याच दरम्यान बारामतीकडून निरेकडे निघालेल्या (एम. एच. 20 डी. 8047) या क्रमांकाच्या एसटीच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

बारामती बस स्थानकातून सुटणारी प्रत्येक एसटी शहरातून न नेता त्या रिंगरोडने न्यावी, अशी सूचना बारामती बस आगाराकडून चालकांना वारंवार दिली जात आहे. मात्र, तरीही काही बस चालक या सूचनांना न जुमानता थेट शहरातील गर्दीच्या रस्त्यावरूनच बस दामटत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच अशा प्रकारचे अपघात घडत आहेत

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.