Wakad : फोनवर बोलत जात असलेल्या तरुणाचा मोबईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने फोनवर बोलत जात असलेल्या तरुणाचा मोबईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना सोमवारी (दि. 9) रात्री साडेसात वाजता बिर्ला हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे.

अब्दुल मुजाईक शेख (वय 20), अरुण शेनअप्पा मजगे (वय 22, रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रतिक राजेंद्र बोंबले (वय 27, रा. नारायणगाव, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी बोंबले चिंचवडगाव येथील बिर्ला हॉस्पिटलच्या समोरून सार्वजनिक रस्त्याने फोनवर बोलत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून (एम एच 14 / एच वाय 8757) आलेल्या चोरट्यांनी बोंबले यांचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. वाकड पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन मंगळवारी चोरट्यांना बेड्या ठोकल्या. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.