Pune News : पुणे शहरात आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या चौपट

बधितांमध्ये 70 टक्के रुग्ण दोन्ही डोस घेतलेले

एमपीसी न्यूज : गेल्या आठवडाभरात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे. या काेराेना बाधित रुग्णांपैकी 70 ते 75 टक्के रुग्णांनी काेराेना प्रतिबंधित लसीचे दाेन्ही डाेस घेतलेले आहेत. डाेस घेतल्यामुळे या रुग्णांमध्ये साैम्य लक्षणे असुन, सध्या सक्रीय रुग्णसंख्या जरी वाढली असली तरी रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावे लागण्याचे प्रमाणही कमी आहे. असे असले तरी शहरात नवे निर्बंध न लावता सध्याच्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करणार येणार असल्याची माहिती महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी दिली.

शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभुमीवर सोमवारी आढावा बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परीषदेत महापाैर माेहाेळ यांनी काेराेनाची शहरातील सद्यस्थिती स्पष्ट केली. यावेळी उपमहापाैर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित हाेते.

सध्या शहरात अडीच हजार सक्रीय रुग्ण असल्याचे नमूद करीत महापाैर माेहाेळ म्हणाले, ‘‘ शहरात नव्याने आढळून येणाऱ्या काेराेनाच्या रुग्णांमध्ये साैम्यपणाची लक्षणे दिसून येत आहेत. तसेच अाेमायक्राॅनचे 47 रुग्ण आढळून आले असुन, त्यांच्यामध्येही साैम्य लक्षणे दिसून येत आहेत. विशेेष म्हणजे काेराेनाची लागण झालेल्यांच्या तुलनेत ओमायक्राॅनची लागण झालेल्यांमध्ये कमी लक्षणे दिसुन येत आहे.’’

‘‘गेल्या आठ दिवसांत नवीन रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामध्ये दुसरा डाेस घेतल्यानंतरही काेराेनाची लागण झालेल्यांचे प्रमाण 70 ते 75 टक्के इतके अाहे. डाेस घेतल्यामुळे या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ अालेली नाही. सध्या अडीच हजारापैकी 300 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुुुरु आहे. रुग्णसंख्या पुढील काळात वाढल्यानंतर काय उपाययाेजना करता येईल यािवषयी बैठकीत चर्चा झाली आहे.

महापािलकेकडे मुबलकप्रमाणात औषधसाठा आहे. सुमारे चार हजार रेमडेसिवीर इंजेक्शन, आययसीयु – व्हेंटीलेटर- ऑक्सिजन आणि साधे असे एकुण अठराशे बेड, प्रति मिनिट साडेनऊ हजार लिटर अाॅक्िसजन निर्मिती करणारे प्लांट तयार आहेत. तसेच अाॅक्सिजन साठा 130 किलाेलीटर इतका करण्याची क्षमता आहे. तसेच हडपसर, वारजे, येरवडा येथील आणखी तीन रुग्णालये नव्याने आराेग्य सेवेत दाखल झाली आहे. जम्बाे रुग्णालय आणि काेव्हीड केअर सेंटरही सुरु करण्याचे महापािलकेचे नियाेजन झाले आहे.’’

ऑनलाइन शाळेबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय 

लसीकरणामध्ये  पुणे राज्यात सर्वात पुढे आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोस  सुरु करत आहोत. तसेच नवीन निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यात शाळा ऑनलाइन घेणे, उद्यानं  आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विचार केला जाईल, असं महापौरांनी स्पष्ट केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.